| मुख्य पान |
"माणदेश फाऊंडेशन" हे माणतालुक्यातून बाहेर पडून विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या आणि माण तालुक्याच्या तसेच एकूण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत राहणाची इच्छा असणार्याची संघटना आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने जुन २००९ ला हि संस्था पुण्यातील माणदेशच्या काही जणांनी मिळून सुरू केली. आपण समाज्याचं काहीतरी देणं लागतो, हा उदात्त हेतू समोर ठेवून माणदेशच्या जनतेस मदत करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य म्हणजेच माणदेश फाउंडेशन. माणदेशात गरिब, पिडीत माणसांची संख्या मोठी आहे पण त्यांच्यासाठी काम करणारे कमी आहेत. एक माणदेशचा नागरिक म्हणून इतरांसाठी मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे.
या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, अरोग्य आणि शेती
विषयी योजना राबिवण्यात येणार आहेत.
|