MandeshFoundation.org Mandesh Foundation Title
  मुख्य पान आमचे उमक्रम संस्थेचे पदाधिकारी कार्यक्रम छायाचित्र दालन संपर्क  
आमचे उमक्रम
१) शैक्षणिक, सांस्कृतीक, धार्मिक, सामाजिक, कार्यक्रमांचे आयोजन करणे.

२) माण तालुक्यातील अर्थिक दुर्बल लोकांसाठी मोठया शस्त्रक्रियेवेळी आर्थिक मदत करणे.

३) माण तालुक्यातील गरीब व होतकरू विद्याथ्र्यांना शैक्षणिक मदत करणे आणि त्यासाठी विद्यार्थी निधी तसेच पुणे येथे राहण्यासठी वस्तीगृह सुरू करणे.

४) विविध वैद्यकीय चिकित्सा शिबीर आयोजीत करणे तसेच रक्तदान, नेत्रदान, व एड्स जनजागृती करणे.

५) मुला-मुलींचे वस्तीगृह, व्यायाम शाळा, अनाथ आश्रम शाळा, इत्यादी उभारणे / स्थापण करणे.

६) देशसेवेच्या कामी आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करणे व उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या सैनिकास संस्थेचे स्मृती चिन्ह देऊन गौरव करणे.

७) माण तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना स्वंरोजगारासाठी सहकार्य करणे.

८) बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्चमाध्यमिक व महाविद्यालये स्थापन करणे.

९) शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचविणे.

१०) वृक्षारोपण करणे व वृक्ष संवर्धन करून तालुक्यात जणजागृती करणे.

११) संस्थेच्या वतीने पुरस्कार, पारितोषक वितरण करणे, तसेच व्यखाने व चर्चासत्रे आयोजीत करणे.

१२) कलापथके, एकांकिका, गायन, तसेच इतर क्रिडा व विविध स्पर्धांचे आयोजन करणे.

१३) विद्याथ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका व पुस्तक पेढी सुरु करणे.

१४) नैसर्गिक आपत्तीच्यावेळी म्हणजेच भूकंप, पूर, दुष्काळाच्या वेळी मदत कार्य सुरू करणे.

१५) रुग्णवाहिकेची सोय करणे व ती गरजूंना उपलब्ध करुन देणे.

१६) पर्यावरणाविषयक संरक्षण व संवर्धनात्मक कार्यक्रम राबविणे.

१७) अंध, अपंग, मतिमंद व मूकबधिरांचे विकासात्मक व पुनर्वसनात्मक विविध उपक्रम राबविणे.

१८) शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाची, अवजारांची तसेच नवीन बि-बियाणे विषयी माहिती उपलब्ध करून देणे व शासनाच्या विविध खात्यामार्फत शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान व अवजारे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.

१९) शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्या मदत करणे.

२०) वीज, रस्ते, पाणीपुरवठा इ.पायाभूत सुविधा पूर्ततेसाठी शासकीय, निमशासकीय तसेच संस्थेच्या माध्यामातून सतत प्रयत्न करणे.

२१) पुण्यातील माण रहिवाशांचा संपर्क वृध्दिगंत करणे आणि संबंधितांच्या सर्वांगीन विकासासाठी सहकार्य व मार्गदर्शन करणे.

 
 
 
 
© २००९ - २०१०, माणदेश फाऊंडेशन, सर्व हक्क सुरक्षित This site is developed and maintained by mandesh.com